कविराज कुसूमाग्रजांनी केलेलं श्रावणाचं वर्णन पर्याप्त आहेच, पण शाळेत असताना जगलेले श्रावण महिन्यातले दिवस आजही स्मरणनीय आहेत. श्रवणातले सोमवार दुपारची शाळा असणाऱ्यांसाठी अधिकच लाडाचे दिवस असतात.

ह्या अविस्मरणीय दिवसांची आठवण करून देण्यात सिंहाचा वाटा असतो तो ऊन-सवालीचा खेळ खेळणाऱ्या वातावरणाचा. धो-धो पाऊस पडत असताना शाळेत जायला माला कधीच आवडले नाही. सायकल ने जायचे असल्यास कदाचित आजही आवडणार नाही. खरा प्रश्न पाऊस असल्याचा नाही तर सोबत असलेल्या रेनकोट चा असायचा. विषेशतः श्रावण महिन्यात हा प्रश्न अधिकच गंभीर व्हायचा. घरून निघताना असलेला मुसळधार पाऊस जर वाटेत बंद झाला तर शाळेत पोहचत पर्यंत पावसाने नव्हे तर घामाने न्हाऊन निघण्याचा त्रास असायचा. पाऊस ओसरला की वाटेत थांबून रेनकोट  काढणं म्हणजे मला कटकट वाटायची, आजही वाटते.

श्रावण सोमवारची विशेषता जगासाठी जरी बेलाच्या पानांनी केलेली शंकराची पूजा असली तरी सोमलवार रामदासपेठ च्या पोट्यांसाठी विशेष म्हणजे लेंड्रा पार्क वर झालेली क्रिकेट ची मैच च असायची. लेंड्रा पार्क वर आम्ही फुटबॉल खेळल्याचं मला फारसं आठवत नाही, पण बॉल हरवत पर्यंत क्रिकेट मात्र नक्की खेळलो. सोमवार ची ही मजा शनिवारी जेव्हा पवन दादा नोटिस घेऊन यायचा, तेव्हाच सुरु व्हायची. अपेक्षेप्रमाणे नोटिस वाचून झाल्यावर सर्वसंमतीने एकत्र काढलेला “ओs होss” चा सूर शिक्षकांसाठीही अविस्मरणीय आहे. शाळेच्या जवळ राहणाऱ्यांकडे बॅट ची तर पुला-पलीकडे राहणाऱ्यांकडे बॉल ची जबाबदारी असायची. सोमवारी लवकर सुटी होणार ह्या आनंदाने शाळेत जायची मजा काही निराळीच असायची. लवकर सुटी आणि त्यातही शेवटचा तास मोकळा मिळाला तर मग काही विचारायलाच नको. ह्या रिकाम्या वेळात शिक्षकांची नजर चुकवून वर्गातल्या वर्गात बॉल खेळताना पकडल्या गेल्याचही माझ्या लक्षात आहे. शेवटची घंटा झाल्यावर लवकरात लवकर प्रार्थना संपवून वर्गाबाहेर पळणं हा आमच्या क्रिकेट टीम चा एकमेव उद्देश असायचा, कारण लेंड्रा पार्क वर सर्वप्रथम पोचणाऱ्या टीमचा चांगल्या पिच वार हक्क गाजवण्याचा अधिकार असायचा. स्टंप म्हणून कसेबसे दगडं उभे करून शाळेच्या गणेवषात खेळलेली क्रिकेटच्या मैच च्या आठवणींनी आजही मन आनंदी होतं. त्या आठवणींना उजाळा देण्याचा हा एक प्रयत्न.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s